Va Pu Kale Quotes.

जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही ह्यावर माझा विश्वास नाही....
आयुष्यभर ठसठस असलेली पण न सांगता येणारी असंख्य दुःख तो आपल्या बरोबर नेतो.

माणूस अपयशाला भीत नाही . अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर ?
याची त्याला भीती वाटते .

पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्यूला आमंत्रण दिलंय. जीवनाची हीच गम्मत आहे.
आपण प्रतिक्षणी मारतो आणि म्हणतो , 'जगतोय '.






Va Pu Kale Thoughts In Marathi

भूक आहे तेवढ खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती...

संसार असाच असतो.
लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं.
दरी निर्माण झाली म्हणजे आपण खोल जायचं नसतं. ती पार करायची असते....

आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संपत्ती लाभली की ,
धकधकाची वाटचाल सरळ वाटते. निखारे सौम्य होतात,
काट्यांची टोक बोथट होतात आणि सार सोपं होऊन जात....

कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो.....